आरटीओ पथकांकडून स्कूलबसची तपासणी File Photo
छत्रपती संभाजीनगर

आरटीओ पथकांकडून स्कूलबसची तपासणी

पहिल्याच दिवशी १२ बस जप्त : कारवाई सुरूच राहणार

पुढारी वृत्तसेवा

School buses inspected by RTO teams

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विनापरवाना स्कूलबस तसेच विनाफिटनेस स्कूलबस विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने गुरुवार (दि.१८) पासून आरटीओच्या पथकाने तपासणी सुरू केली. पहिल्याच दिवशी १२ स्कूलबस जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे अपडेट करूनच रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.

स्कूलबस प्रकरणी आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरटीओ कार्यालयाने वायुवेग पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार गुरुवारपासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. स्कूलबस तपासणीला सकाळपासूनच सुरुवात करण्यात आली.

यात फिटनेस प्रमाणपत्र नसणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवणे, अग्निशमन यंत्रणा व आपत्कालीन दरवाजांची अनुपलब्धता, तसेच चालकांकडे आवश्यक परवाने नसणे आदींप्रकरणी तपासणी करून अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या स्कूलबसवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्याच दिवशी १२ स्कूलबसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

स्कूलबसच्या फिटनेसह आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत. गुरुवारपासून हाती घेण्यात आलेली मोहीम सुरूच राहणार असून, ही कारवाई टाळण्यासाठी बसचालकांनी कागदपत्रे सोबत बाळगावीत अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.
विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT