School bells will ring again today after Diwali vacation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सुट्यानंतर सोमवार (दि. ३) पासून शाळा सुरू होत आहेत. शिक्षण विभागाकडून या द्वितीय सत्रातील उपक्रमांची आखणी करून देण्यात आली आहे.
दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ ऑक्टोबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सुट्या देण्यात आल्या होत्या. हा कालावधी संपल्याने आता ३ नोव्हेंबरपासून शाळांना सुरुवात होत आहे. वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील शाळांना यंदा दिवाळीच्या अठरा दिवस सुट्ट्या मिळाल्या. शाळांसाठी शैक्षणिक वर्षात एकूण २३८ कार्यदिन आहेत. त्यातील सुट्ट्यानंतर द्वितीय सत्राला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात शाळांमध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ झाली.
द्वितीय सत्रात शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आखणी शिक्षण विभागाकडून करून देण्यात आली आहे. त्यासह इतर उपक्रमांबाबत शाळा प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील शाळांची संख्या ४ हजार ४५९ एवढी आहे. शाळांमध्ये आठ लाख ७२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील शाळांनी "विद्यार्थ्यांचे दिवाळी सुट्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करण्यासाठी अनेक शाळांकडूनही विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येते. शहरासह जिल्ह्यातील शाळांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले जाते, असे शिक्षकांनी सांगितले.
▶▶ जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या ४४५९
▶▶ एकूण विद्यार्थी संख्या ८७२८३५
▶▶ जिल्हा परिषद शाळा २०९०
▶▶ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या १९१७०६
अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा ९५६
अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थी संख्या ४११३५३
>> विनाअनुदानित, स्वयंअर्थसहित शाळा १२२४
▶▶ विद्यार्थी संख्या २४८४७७
▶▶ समाजकल्याण विभाग शाळा ४५