Sanjay Shirsat : ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट file photo
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat : ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट

पालकमंत्री संजय शिरसाट यांची खोचक टिका

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Shirsat: The Thackeray brothers' march is a publicity stunt

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'गर्जना मोर्चा' काढण्यात आला. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी हा मोर्चा म्हणजे टी-शर्ट घालून हवा करण्याचा आणि टीआरपी मिळवण्याचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशी टिका करत ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली.

टीआरपी मिळवण्याचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशी टिका करत ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, मुंबईत मोर्चातील मुद्द्यांपेक्षा दोन भाऊ एकत्र येत आहेत, याचीच जास्त चर्चा आहे. हा निव्वळ एक इव्हेंट आहे.

हातात हात घालून फोटो काढायचे, अर्धा किलोमीटर चालायचे आणि मोर्चा यशस्वी झाला असे दाखवायचे, एवढाच यांचा कार्यक्रम आहे. या मोर्चाचे नेमके नेतृत्व उद्धव ठाकरेंचे की राज ठाकरेंचे? हे आधी स्पष्ट करा, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानेश कुमार यांचया बाबत मागणी योग्य असेल तर त्याचा विचार केंद्र सरकार करेल, असेही ते म्हणाले.

ताकद असेल तर चल्लो दिल्ली म्हणा

ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा काढला; पण एका तरी मित्रपक्षाने यांना सहकार्य केले का ? कुणी आपले कार्यकर्ते या मोर्चात पाठवले का? असा सवाल त्यांनी केला. मागणी जर एवढीच गंभीर असेल, तर मुंबईत ड्रामा कशाला करता ? ताकद असेल तर जंतर-मंतरवर जा आणि 'चलो दिल्ली'चा नारा द्या. असा टोलाही लगावला.

ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा काढला; पण एका तरी मित्रपक्षाने यांना सहकार्य केले का ? कुणी आपले कार्यकर्ते या मोर्चात पाठवले का? असा सवाल त्यांनी केला. मागणी जर एवढीच गंभीर असेल, तर मुंबईत ड्रामा कशाला करता ? ताकद असेल तर जंतर-मंतरवर जा आणि 'चलो दिल्ली'चा नारा द्या. असा टोलाही लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT