कुंजखेडा शिवारात वाळूमाफियांना चाप file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कुंजखेडा शिवारात वाळूमाफियांना चाप

विनापरवाना वाळू वाहतूक, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Sand mafia clamped down in Kunjkheda Shivara

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील कुंजखेडा शिवारात विनापरवाना शासकीय गौण खनिज वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन आयशर वाहनांवर कन्नड ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता कारवाई करत अंदाजे ५१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर-ोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिस हेडकॉन्स्टेबल धीरज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हतनूरचे बिट जमादार कैलास करवंदे यांना माहिती मिळाली की कुंजखेडा मदरसा ते दाभाडी रस्त्यावरून दोन आयशर वाहनांमधून शासकीय गौण खनिज वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी सापळा रचला.

यावेळी आयशर वाहन क्रमांक ( एमएच-१९ सीएक्स ७२१९) या वाहनावर दुसरी नंबर प्लेट (एमएच २० जीसी ९१४७) लावलेली आढळून आली. तर दुसरे आयशर वाहनही त्याच मार्गाने येताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले.

वाहनमालक व चालक मुक्तार शब्बीर पठाण (रा. कुंजखेडा) तसेच दुसरा चालक (नाव अज्ञात) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कैलास करवंदे करत असून गुन्हयातील आरोपी मुस्ताक शब्बीर पठाण यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, बिट जमादार कैलास करवंदे, पोहेकॉ धीरज चव्हाण व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT