Samruddhi Highway : 'समृद्धी'वर पुन्हा दगडफेक; वाशिम जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय वाहनाला केले लक्ष्य file photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway : 'समृद्धी'वर पुन्हा दगडफेक; वाशिम जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय वाहनाला केले लक्ष्य

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक होण्याचे सत्र सुरूच असून गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सावंगी परिसरात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.

पुढारी वृत्तसेवा

'Samruddhi' (Expressway) targeted with stone-pelting once again; government vehicle from Washim District Hospital comes under attack

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक होण्याचे सत्र सुरूच असून गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सावंगी परिसरात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या हल्ल्यात वाहनाच्या समोरील काचेचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने आतील पाच अधिकारी-कर्मचारी थोडक्यात बचावले थोडक्यात बचावले.

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिम्मत राठोड हे सहकाऱ्यांसह शासकीय वाहनाने (एमएच ३१ एफआर ७२४०) पुण्यातील एका बैठकीसाठी निघाले होते. वाहनात चालक रामकिशन घुगे यांच्यासह एकूण पाच जण आणि बैठकीची महत्त्वाची कागदपत्रे होती. सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास महामार्गावरील चॅनेज क्रमांक ४२६ (सावंगी परिसर) येथे अज्ञाताने चालत्या वाहनावर दगड भिरकावला.

अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे वाहनाची समोरील काच फुटली आणि आतील कर्मचारी भयभीत झाले. प्रसंगावधान राखत चालक घुगे यांनी वाहन तेथे न थांबवता सुमारे तीन किलोमीटर पुढे नेऊन सुरक्षित ठिकाणी उभे केले. त्यानंतर तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला.

दरम्यान, सायंकाळी ६.३१ वाजता समृद्धी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळताच आयसी-१६ सावंगी येथील सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले. महामार्ग पोलिसांचे पथकही अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सल पोलीस ठाण्यात जावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेत मोठा वेळ जाईल आणि पुण्यातील बैठकीला पोहोचण्यास उशीर होईल, या कारणास्तव संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करताच पुण्याच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. त्यामुळे या घटनेची अद्याप पोलिसांत अधिकृत नोंद होऊ शकलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT