Student head count : शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू File photo
छत्रपती संभाजीनगर

संस्थाचालकांच्या विरोधानंतरही पटपडताळणीला सुरुवात

संस्थाचालकांच्या तीव्र विरोधानंतरही राज्यात शनिवारपासून इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पटपडताळणीला सुरुवात झाली.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Verification Begins Despite Opposition from Management

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संस्थाचालकांच्या तीव्र विरोधानंतरही राज्यात शनिवारपासून इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पटपडताळणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११३७ शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ९६४ शाळांची पटपडताळणी होऊ शकली आहे. या कामासाठी १३६ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित शाळांची पटपडताळणी १५ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २०८४ प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय अनुदानित प्राथमिक शाळांची संख्या ही २९२ इतकी आहे. या शाळांमधून सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्यावतीने शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांच्या पदांची संख्या वेळोवेळी निश्चित केली जाते. यंदा शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्येची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने पटपडताळणीच्या तारखा निश्चित करून दिल्या आहेत. संपूर्ण राज्यात इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांची पडताळणी ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यासाठीचे नियोजन पूर्ण केले आहे. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यात १३६ पथकांच्या माध्यमातून ११३७ शाळांमध्ये पडताळणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात ९६४ शाळांची पटपडताळणी होऊ शकली नाही. पटपडताळणीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर पथके असणार आहेत. या पथकांमध्ये शिक्षण विभागासोबत जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके जिल्हा परिषदेच्या शाळांसोबतच शासकीय अनुदानित शाळांवर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी करणार आहेत.

पटपडताळणी झालेल्या जिल्ह्यातील शाळा

संभाजीनगर १६९/१४५

फुलंब्री - ७३/७०

खुलताबाद ४७/४५

पैठण - ११५/१०२

७४/७२ कन्नड

३८/३८ गंगापूर

वैजापूर - ६३/५५

सिल्लोड २०२/१८३

सोयगाव - ६९/६९

मनपा २०५/१८५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT