Vaijapur Mother and Son death
वैजापूर : आई व मुलाचे एकाच दिवशी निधन झाल्याची हृदय द्रावक घटना बुधवारी (१० डिसेंबर) वैजापूर तालुक्यातील करंजगा व येथे घडली. करंजगाव येथे गंडे वस्ती येथे राहणारे भाऊसाहेब कचरू गंडे (वय ६५) यांचे पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. मुलाच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने आई लक्ष्मीबाई कचरू गंडे ( वय ९०) यांनी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास प्राण सोडला.
आई व मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने करांजगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भाऊसाहेब गंडे हे पाच वर्षांपासून पॅरालीसीस आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूच्या शोकाने आई लक्ष्मीबाई यांचा देखील मृत्यू झाला. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे
आई मुलाच्या नात्याची अखेरची कहाणी
आई मुलाचे नाते हे मायेच्या धाग्याने विणलेले असते. मुलाला लागलेली कोणतीही वेदना आईच्या हृदयात थेट पोहोचत असते. आयुष्यभर सावलीसारखी सोबत करणारी आई, आणि आईकडे न बोलताही ओढीनं धावून जाणारा मुलगा—हीच त्या नात्याची ताकद. या जगातून जाण्याची वेळही दोघांनी जणू ठरवूनच ठेवली… एक गेला, तर दुसरी त्याच्या विरहाचा आघात सहन करू शकली नाही. प्रेमाच्या या बंधाने दोघांना शेवटच्या क्षणीही वेगळं होऊ दिलं नाही.