वैजापूर तालुक्यातील गंगापूर रोडवरील घायगाव येथील ‘मेसर्स भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीज’ या ऑइल रिपॅकिंग युनिटवर धाड  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar FDA Action | वैजापुरात एफडीएची मोठी कारवाई ; २३ लाखांचा साठा जप्त, ‘भाग्योदय ॲग्रो’चा परवाना निलंबित

वैजापूर तालुक्यातील गंगापूर रोडवरील घायगाव येथील ‘मेसर्स भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीज’ या ऑइल रिपॅकिंग युनिटवर धाड

पुढारी वृत्तसेवा

Vaijapur FDA Raid

वैजापूर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बेजबाबदार अन्न उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत कठोर कारवाई केली आहे. वैजापूर तालुक्यातील गंगापूर रोडवरील घायगाव येथील ‘मेसर्स भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीज’ या ऑइल रिपॅकिंग युनिटवर धाड टाकून प्रशासनाने तब्बल २३ लाख ३२ हजार ४५५ रुपयांचा १० हजार ७९८.४ किलो संशयास्पद साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अन्नधान्य व खाद्यतेल बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या पथकाने ही अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान या कारखान्यात आरोग्याच्या नियमांना अक्षरशः तिलांजली दिल्याचे उघडकीस आले.

कारखान्याची फरशी तेलकट व तुटलेली होती, उत्पादनासाठी पिण्यायोग्य पाण्याची खात्री नव्हती आणि अन्नपदार्थ थेट उघड्या जमिनीवर साठवले जात होते. तसेच, कामगारांकडे सुरक्षेचे हातमोजे व ॲप्रन नव्हते आणि एकही कर्मचारी अन्न सुरक्षा प्रशिक्षण घेतलेला नव्हता. कारखान्याला अन्न सुरक्षा मानके व नियमांच्या (एफएसएसएआय) निकषांनुसार ८६ पैकी केवळ ३६ गुण मिळाल्याने तो अपात्र ठरला.

अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या या कारखान्याचा परवाना विभागाने तात्काळ निलंबित केला असून, त्रुटींची पूर्तता करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT