Sambhajinagar This year, 70 feet Ravana will be burnt
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दसरा उत्सव म्हटले की, सर्वत्र मोठा उत्साह असतो. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची परंपरा जोपासली जाते. शहरातील सिडको एन-७ रामलीला मैदान येथे गेले अनेक वर्षांपासून रावण दहन करण्याची परंपरा जोपासली जाते.
यावर्षीही रावण दहन करण्याची परंपरा रामलीला मैदानावर जोपासली जात असून, यावर्षी दसऱ्यानिमित्त ७० फुटी रावण दहन केला जाणार आहे. त्यानिमित्त ७० फुटी रावण प्रतिकृती तयार केली असल्याची माहिती बंटी दीक्षित यांनी दिली.
गेल्या ४८ वर्षांपासून रामलीला मैदान येथे दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. चंद्रेशजी दीक्षित यांच्या संकल्पनेतून ही परंपरा सुरू झाली आहे. रामलीला मैदान येथे रावणाची प्रतिकृती बनविण्यासाठी कारागीर येऊन मेहनत घेतात. यावर्षीही उत्तर प्रदेश येथून दहा कारागीर रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी आले असून, रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. यात चांदभाई यांची टीम मेहनत घेत आहेत.
यावर्षी दसऱ्यानिमित्त शहरातील रामलीला मैदान, टीव्ही सेंटर, वाळूज महानगरातील बजाजनगर आणि मयूरनगर या चार ठिकाणी यंदा रावण दहन केले जाणार आहे. चार ठिकाणासाठी बनविल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ४८ वर्षांपासून सुरू असलेली रामलीला मैदान येथील रावण दहन करण्याची परंपरा कायम आहे. ही परंपरा यावर्षीही कायम ठेवली असून, यंदा ७० फूट रावण आणि ६५ फुटी कुंभकर्णच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे. याशिवाय वाळूज या ठिकाणी रावण दहन कार्यक्रमासाठी ५० फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तर टीव्हीसेंटर येथे घेण्यात येणाऱ्या रावण दहन कार्यक्रमात ५० फुटी रावणाची प्रतिकृती बनविण्यात येत आहे. याशिवाय मयूरनगर येथे होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमासाठी ४५ फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.
रावणाच्या प्रतिकृतीबरोबर कुंभकर्णाचीही प्रतिकृती तयार केली जात आहे. यंदा रामलीला मैदानावर होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमात ७० फुटी रावण बनविण्यात येत आहे. तसेच ६५ फुटी कुंभकर्णाचेही दहन होणार आहे. ७० फुटी रावण, ६५ फुटी कुंभकर्णाची प्रतिकृती बनविण्यासाठी बांबू वापण्यात आले आहेत. तसेच साड्याही वापरण्यात आल्या आहेत.