Illegal Construction प्रवाहाच्या गळचेपीने नाल्यांचा थांबला प्रवाह File Photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal Construction : प्रवाहाच्या गळचेपीने नाल्यांचा थांबला प्रवाह, पावसाचे पाणी शिरतेय थेट घराघरांत

शहरातील अनेक नाले अतिक्रमणाच्या विळख्यात

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar The flow of the drains stopped due to the blockage of the stream

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रमुख नाल्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्याने पाणी वाहून जाण्याच्या नैसर्गकि प्रवाहाची गळचेपी झाली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस झालेल्या अतिमुसळधार पावसाचे पाणी सातारा, देवळाई, नारेगाव, शिवशंकर कॉलनी, टाऊन हॉल, क्रांतीनगर या भागातील घराघरांमध्ये शिरल्याचे दिसून आले. नैसर्गकि आपत्तीपेक्षा ही समस्या महापालिकेच्या हलगजीपणाची आणि बेकायदेशीर बांधकामांची असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेंतर्गत अंदाजित शहरातील सुमारे १६० किमी लांबीच्या नाल्यांपैकी ७० किमी नाले विविध प्रकारच्या अतिक्रमणाखाली दबले गेले आहेत. यात खटोड नाला, देवळाई-नारेगाव पट्टा आणि सातारा परिसरातील दोन नाल्यांमध्ये अतिक्रमण झाल्याने त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता अध्याहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी वाहून नेण्याऐ वजी ते वसाहतीत साचते. दरम्यान शहरातील नाले हे मूळतः ओढ्यांच्या प्रवाहाशी जोडलेले होते.

गेल्या दहा वषींत या प्रवाहांवर सुमारे १,२०० पेक्षा जास्त लहानमोठी बांधकामे झाल्याचे प्राथमिक सर्व्हेतून स्पष्ट झाले असून, पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडण्याची ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. दरवषी मनपा पावसाळ्यापूर्व साफसफाईसाठी अंदाजे १० ते १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करते. खोलीकरण, रुंदीकरण यासारखी कामे कंत्राटी पातळीवर होत असली तरी अतिक्रमणांवर कारवाई शून्य आहे.

निधी खर्च होतो, पण नाले मोकळे होत नाहीत. महापालिका प्रशासन फक्त मफ्सफाई झालीफ्फ असे दाखवते, प्रत्यक्षात प्रवाह मात्र बंदच राहतो. दरम्यान ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. तेथील प्रवाह मोजणीचे काम प्रशासनाऐवजी काही बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आहे. त्यामुळे नाले मोकळे करण्याऐवजी त्यांचे संरक्षणच अधिक होत असल्याचे चित्र आहे. या हस्तक्षेपामुळे महापालिकेची कारवाई ठप्प होत असून, बेकायदेशीर बांधकामांना बळ मिळत आहे.

नाल्यांची घटली क्षमता

शहरात दरवषी पावसाळ्यापूवी नाले सफाई केली जाते. त्यानुसार नाल्यांचा नैसर्गकि प्रवाह सक्षम असायला हवा. मात्र अतिक्रमणामुळे नाल्यांची क्षमता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घटली आहे. त्यामुळे मध्यम पावसातही शहर जलमय होते आहे. हे कायमचे झाले असून, त्यावरील उपाययोजना केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून वाचवायचे असेल, तर प्रथम ७० किमी अतिक्रमित नाले तातडीने मोकळे करणे गरजेचे असून, खोलीकरण वा रुंदीकरणासारखी कामे ही केवळ तात्पुरती ठरत आहे. त्यामुळे शहराचा शाश्वत विकास आणि नागरिकांचे सुरक्षित जीवन हे नाले अतिक्रमणमुक्त करणे गरजेचे असल्याचे परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे.

अतिक्रमण काढण्याची करणार कारवाई

शहरातील काही नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यानुसार आम्ही लवकरच सर्व्हे करणार आहोत. यामध्ये ज्याठिकाणी अतिक्रमण असेल ते काढण्याबाबत लवकरच आयुक्त यांच्या आदेशाने धोरण ठरवणार आहोत. तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येईल. अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता, ड्रेनेज विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT