छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर: शाळा खाजगीकरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर

अविनाश सुतार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सरकारी शाळांचे खासगीकरण आणि अशैक्षणिक कामांचे ओझे याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी (दि.२) छत्रपती संभाजीनगरात महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शिक्षक आणि त्यांच्यासोबत पालकही सहभागी झाले आहेत.

क्रांती चौकातून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाला २२ शिक्षक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकरराव वालतुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे बंद करा, मुख्यालयी राहण्याची अट रद्द व्हावी, जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे, सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना देण्याचा निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT