Sambhajinagar News : विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून मुकण्याची शक्यता file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून मुकण्याची शक्यता

सारथी, बार्टीकडून अर्ज प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: University research students likely to miss out on fellowships

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पेट २०२४ ची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील पात्र संशोधक विद्यार्थी सारथी आणि बार्टीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) पासून मुकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली.

नुकतीच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ आणि २०२५ मधील पीएच. डी. संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जात विद्यार्थ्याचे प्रवेश विद्यार्थ्यांकडून (फेलोशिप) कायम असणे आवश्यक आहे. दरम्यान बामू तील पेट २०२४ ची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पुर्ण झालेल्या नाही. त्यामुळे या विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना या फेलोशिपपासून मुकावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सारथीतर्फे मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर बार्टीच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना राबवली जात आहे. सारथी अंतर्गत २५० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

या फेलोशिपसाठी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी ५५ टक्के मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रासाठी २५ टक्के आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी १० टक्के आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १० टक्के जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या फेलोशिपचा कमाल कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. तर बार्टीच्या जाहिरातीनुसार अर्ज प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली असून

शैक्षणिक आर्थिक नुकसान : दरम्यान, या दोन्ही योजनेत आवश्यक असलेली पेट २०२४ ची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. यात १४३६ संशोधकांची निवड झालेली असून त्यांचे शैक्षणिक, आर्थिकही नुकसान होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली असती तर फेलोशिपचा लाभ या विद्यार्थ्यांना झाला असे एसएफआयचे राज्य समितीचे अरुण मते म्हणाले.

प्रयत्न सुरू विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
डॉ. प्रवीण वक्ते, प्र कुलगुरू

प्रयत्न सुरू

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

डॉ. प्रवीण वक्ते, प्र कुलगुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT