Sambhajinagar News : अत्याधुनिक मेडिकल पार्कसह शंभर कोटींचे सेवा प्रकल्प file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अत्याधुनिक मेडिकल पार्कसह शंभर कोटींचे सेवा प्रकल्प

लायन्स क्लबचे प्रांतीय गव्हर्नर राहुल औसेकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Service projects worth ₹100 crore, including a state-of-the-art medical park

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लायन्स क्लब मिडटाऊनतर्फे पैठण रोड येथे २७हजार चौरस फूट जागेवर सुमारे ४० कोटी रुपये खर्चाचे, १०० बेडचे असिस्टेड लिव्हिंग सेंटर आणि विविध वैद्यकीय सुविधांनी ८० हजार चौरस फुटांचे अत्याधुनिक मेडिकल पार्क उभारण्यात येत आहे. यासह तब्बल १०० कोटींच्या सेवा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे नवनियुक्त प्रांतीय गव्हर्नर लायन राहुल औसेकर यांनी सांगितले.

लायन्स क्लब्स आंतरराष्ट्रीय प्रांत ३२३४ एच २ च्या २०२६-२७ या सेवावर्षाचा सूर्योदय पदग्रहण सोहळा रविवारी एमआयटी कॉलेज परिसरातील मंथन हॉलमध्ये उत्साहात पार पडला. तत्पूर्वी शुक्रवारी लायन्स आय हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत १४ जिल्ह्यांमधील गरजू कोटींच्या घटकांसाठी शंभर कायमस्वरूपी सेवा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

यावेळी नूतन कार्यकारिणीमधील लायन जितेन्द्र महाजन, मोरेश्वर कुलकर्णी, पदग्रहण सोहळ्याचे नियोजन मुख्य संयोजक लायन स्मिता मालपाणी व सह-संयोजक लायन नंदकिशोर मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. औसेकर म्हणाले, २५ कोटी रुपयांच्या लायन्स आय हॉस्पिटलच्या नवीन युनिटचा शिलान्यास, लातूर येथे अत्याधुनिक डायग्नोस्टिक आणि डायबिटीज केअर सेंटर, तसेच समर्थनगर येथील शाळेत डिजिटल स्कूल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

१४ जिल्ह्यांसाठी शंभर कोटींचे प्रकल्प

पैठण रोडवर १०० बेडचे असिस्टेड लिव्हिंग सेंटर

८० हजार चौरस फुटांचे अत्याधुनिक मेडिकल पार्क

लायन्स आय हॉस्पिटलच्या नवीन युनिटचा शिलान्यास-लातूर येथे डायग्नोस्टिक व डायबिटीज केअर सेंटर

समर्थनगर शाळेत डिजिटल स्कूल उपक्रम

१४ जिल्ह्यांतील गरजूंसाठी कायमस्वरूपी सेवा प्रकल्पसेवा

प्रकल्पांची एकूण किंमत : सुमारे १०० कोटी रूपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT