Sambhajinagar News: Municipal schools now have sports names
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा अत्यावश्यक घटक असल्याच्या विश्वासातून मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी एक अभिनव संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत मनपाच्या विविध शाळांना वेगवेगळ्या खेळांची नावे देण्यात येत आहेत. या संकल्पनेनुसार किराडपुरा क्र. १ उर्दू शाळेला ङ्गङ्घफुटबॉलची शाळाफ्फ असे नाव देण्यात आले असून, शाळेत अत्याधुनिक ऍस्ट्रोटर्फ मैदान तयार करण्यात आले आहे.
शहरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढण्यास मदत व्हावी, या दृष्टिकोनातून शाळांमध्ये विविध खेळांच्या सुविधांसह त्यासाठी आवश्यक बाबी उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यानुसार मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी नुकतीच किराडपुरा येथील शाळेला भेट देत मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत फुटबॉल आणि क्रिकेट खेळत त्यांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान 'आम्हाला खेळू द्या' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण, शिस्त आणि संघभावनेचे धडे दिले जातील, असे या शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी सांगितले.
फुटबॉल हा जागतिक पातळी-वरील लोकप्रिय खेळ आहे. आपल्या शाळेतील मुले आणि मुलींना योग्य प्रशिक्षण मिळाले तर ते या खेळात नावलौकिक मिळवू शकतात, विद्यार्थ्यांनी असा सराव करावा की त्यांच्या मेहनतीचा घाम मैदानावर दिसला पाहिजे, असे श्रीकांत यांनी सांगत विद्यार्थ्यांच्या फिटनेस, तंदुरुस्ती आणि टीमवर्कवर भर देण्याचे त्यांनी निर्देश दिले.