Contaminated Water : सिडकोत नळांना दूषित पाण्याच्या वृत्ताची एमजीपीकडून दखल file photo
छत्रपती संभाजीनगर

Contaminated Water : सिडकोत नळांना दूषित पाण्याच्या वृत्ताची एमजीपीकडून दखल

जलशुद्धीकरण केंद्रासह जलकुंभांतील नमुने तपासले : पाणी सुरक्षित असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News : MGP takes note of the report of contaminated water in Sidko taps

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको एन-३ परिसराला नळांना दूषित पाणी येत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) तातडीने त्याची दखल घेत रविवारी (दि. १२) सकाळी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली. जलशुद्धीकरण केंद्रासह विविध उंच जलकुंभांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिल्लक क्लोरीनचे प्रमाण अपेक्षित मर्यादत आढळल्याने पाणी निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेतून सिडको परिसराला पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र एन-३ भागाला नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले. या न वृत्ताची दखल घेत एमजीपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी रविवारी सकाळी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली.

या ठिकाणी शिल्लक क्लोरीनचे प्रमाण ३.०० मिग्रॅ. लिटर नोंदविण्यात आले. त्यानंतर वेदांतनगर, विश्वभारती, क्रांती चौक, एन-५ मधील जलकुंभ क्रमांक २ व ३ तसेच एन-७ मधील जलकुंभ क्रमांक २ व ३ येथील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. सर्व ठिकाणी शिल्लक क्लोरीनचे प्रमाण समाधानकारक असल्याने वितरण व्यवस्थेत निर्जंतुकीकरण प्रभावीपणे होत तसेच प्राधिकरणाने महापालिकेला संबंधित परिसरातील ग्राहकांच्या घरगुती नळांवरील पाण्याचीही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्राहकांच्या नळापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यात किमान ०.२ मिग्रॅ. लिटर मुक्त शिल्लक क्लोरीन असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सिडकोतील काही भागांत दूषित पाणी येत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने ठळकपणे प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले. तपासणीचा अहवाल सार्वजनिक करत पाणी निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा दावा प्राधिकरणाने केला.

शिल्लक क्लोरीन का महत्त्वाचे ?

पाण्यातील शिल्लक क्लोरीन जलवाहिन्यांमधील सूक्ष्मजीवांची वाढ रोखते आणि वितरणादरम्यान होणाऱ्या संभाव्य दूषितीकरणापासून पाण्याचे संरक्षण करते. त्यामुळे ग्राहकांच्या नळापर्यंत सुरक्षित पाणी पोहोचण्यासाठी किमान ०.२ मिग्रॅ. - लिटर मुक्त शिल्लक क्लोरीन आवश्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT