ज्योतीनगर येथे अत्याधुनिक सहासी बालोद्यान उभारण्यात आले आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

CSN First municipal playground project : बर्लिनच्या धर्तीवर शहरात साकारले प्ले पार्क

सीएसएन फर्स्टचा पुढाकार, अत्याधुनिक बालोद्यानाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सीएसएन फर्स्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योतीनगर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सहासी बालोद्यानाचे रविवारी (दि.19) सकाळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बर्लिन येथील प्ले पार्क संकल्पनेवर आधारित हे शहरातील पहिलेच आधुनिक बालोद्यान असून, आम्हाला खेळू द्या या उपक्रमाला यामुळे नवी दिशा मिळाली आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह नगरसेवक शोभा बुरांडे, नवीन ओबेरॉय, शिल्पाराणी वाडकर, चंद्रकांत हिवराळे तसेच सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा, माजी अध्यक्ष राम भोगले, मुकुंद भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष मुकुंद भोगले यांनी या बालोद्यानाची संकल्पना, त्यामागील प्रेरणा आणि प्रकल्प उभारणीतील विविध घटकांचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. रितेश मिश्रा यांनी संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती देताना, शहरात अशा प्रकारचे आणखी असे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला.

सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर शेख हबीब यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रशांत देशपांडे, उमेश दाशरथी, अजित सौन्दलगेकर, मिहीर सौन्दगलेकर, प्रसाद कोकीळ, पालिके अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त नंदकिशोर भोम्बे, शहर अभियंता संजय कोंबडे आणि उद्यान अधीक्षक विजय पाटील विशेष उपस्थिती होती.

बालोद्यान प्रकल्पाचे वैशिष्ट्य

हे बालोद्यान सुमारे 35,000 चौरस फूट क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आले असून, यात ग्रुप स्विंग, लॉग सी-सॉ, झिपलाइन, ट्रीहाऊस, क्लायम्बिंग वॉल, सांगीतिक खेळणी यांसारख्या विविध साहसी व सर्जनशील खेळसुविधांचा समावेश आहे. याशिवाय सुसज्ज पायवाटा, आकर्षक लँडस्केप, बसण्यासाठी सुविधा आणि हिरवळ यामुळे हे उद्यान मुलांसाठी तसेच नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT