Ganeshpur Ganpati Temple Silver Ornaments Stolen Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Temple Theft | गणेशपूर मंदिरातून २ लाख २० हजारांचा चांदीचा ऐवज लंपास

कुलूप तोडून मध्यरात्री चोरी; दोन चांदीचे मुकुट चोरट्याने नेले

पुढारी वृत्तसेवा

Ganeshpur Ganpati Temple Silver Ornaments Stolen

पिशोर : कन्नड तालुक्यातील गणेशपुर येथील प्रसिद्ध गणपती मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री मंदिरात प्रवेश केला. गणपती मूर्तीवरील चांदीचे दोन मुकुट चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. ३०) पहाटे उघडकीस आली. या चोरीत तब्बल २ लाख २० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास झाल्याने गणेशपुर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गणपती मूर्तीवर परिधान केलेले चांदीचे दागिने काढून घेऊन चोरटा पसार झाला.

चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे २ लाख रुपये किमतीचा २ किलो २५० ग्रॅम वजनाचा गोलाकार चांदीचा मुकुट आणि २० हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा मोदकाच्या आकाराचा चांदीचा मुकुट, अशा एकूण २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी पिशोर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मंदिर परिसरासह आजूबाजूच्या भागाची पाहणी केली.

या प्रकरणी गणेशपुर येथील रहिवासी जुलाललिंग सुरसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पुरावे तपासले जात आहेत. चोरीच्या वेळी मंदिर परिसरातील संशयास्पद हालचालींचीही माहिती घेतली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक बरडे करीत असून, आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT