संभाजीनगरात घर फोडून 25 तोळे सोने लंपास  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात घर फोडून 25 तोळे सोने लंपास

घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पुतणीच्या लग्नासाठी जामनेर येथे गेलेल्या कुटुंबीयांचे घर फोडून चोरट्याने सुमारे 24 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने, चांदी आणि रोख 50 हजार असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही धाडसी घरफोडी रविवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास सिडको एन-9 मधील पवननगर भागात उघडकीस आली. घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ उडाली आहे. या सोन्याच्या दागिन्यांचे सध्याचे बाजारमूल्य हे 40 लाखांच्या घरात आहे.

फिर्यादी धनसिंग विनायकराव तोमर (62, रा. पवननगर, एन-9 सिडको) हे मेडिटर सेक्युरिटी या खासगी सुरक्षा कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा एक मुलगा विदेशात तर दुसरा पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहे. तोमर यांच्या पुतणीचे लग्न जामनेर येथे असल्याने ते 7 फेबुवारी रोजी सकाळी 7 वाजता पत्नीसह घराला कुलूप लावून गेले होते. जाताना त्यांनी घराच्या चाव्या शेजारी राहणारे सुनील आढाव यांच्याकडे दिल्या होत्या.

8 फेबुवारी रोजी पहाटे 4.53 च्या सुमारास आढाव यांनी तोमर यांना फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असून, घरातील लाईट सुरू आहेत. तोमर यांनी तातडीने शहरात धाव घेतली. सकाळी 8.30 वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांना घराची अवस्था पाहून धक्काच बसला.

चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये लंपास केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT