Sambhajinagar has become a transit point for the trafficking of Bangladeshi girls.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांगलादेशी मुलींना छत्रपती संभाजीनगरात आणण्यात येते. त्यानंतर येथून त्यांना मागणी असलेल्या विविध शहरांमध्ये पाठविले जाते. बांगलादेशी मुलींच्या मानवी तस्करीसाठी छत्रपती संभाजीनगर हा एकप्रकारे ट्रान्झिट पॉइंट बनला आहे. हा प्रकार खूप गंभीर आणि तितकाच चिंताजनक आहे, असे मत विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी (दि.१८) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
डॉ. नीलम गो-हे यांनी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या की, काही महिन्यांपूर्वी विद्यादीप बालगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून काही मुली पळून गेल्या होत्या. नंतर त्या मुलींना दुसऱ्या बालगृहात ठेवण्यात आले. विधिमंडळात हा विषय उपस्थित झाला, त्यावेळी विधान परिषद सभापतींच्या खुर्चीवरून मी जाहीर केले होते की, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि मी एकत्रितपणे छत्रपती संभाजीनगरात जाऊन त्या मुलींशी संवाद साधू. त्याप्रमाणे आम्ही आज आम्ही भगवानबाबा बालिकाश्रम आणि सावली बालगृहात जाऊन त्या मुलींशी चर्चा केली.
त्यांना बोलते केले. दिलासादायक माहिती मिळाली. तेथील काही मुली चांगले शिक्षण घेत आहेत. या सर्व मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे आढळून आले. तसेच भविष्यात बालगृहांमध्ये मुलींच्या छळाच्या घटना घडू नयेत म्हणून महिला दक्षता समित्यांना अधूनमधून बालगृहांना भेटी देऊन मुलींशी संवाद साधण्याची सूचना करण्यात येणार आहे, असे गोहे यांनी सांगितले. अधूनमधून बालगृहांना भेटी देऊन मुलींशी संवाद साधण्याची सूचना करण्यात येणार आहे, असे गोहे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी वेळो-वेळी बारवर कारवाया केल्या. त्यात बांगलादेशी मुली आढळून आल्या. 1 त्यांच्या आकडेवारीवरून आधी बांगलादेशी मुली इथे आणण्यात येतात आणि येथून त्या इतर शहरांत पाठविल्या जातात हे समोर आले आहे. म्हणून ही तस्करी रोखण्यासाठी अॅन्टी ट्रैफिकिंगसंदर्भात पोलिस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही गोहे यांनी सांगितले.
महिला आणि बालकांविषयीच्या गुन्ह्यांत छत्रपती संभाजीनगरची पोलिस यंत्रणा गंभीर दिसत नाहीत. परभणीमध्ये 2 विद्या देशमुखसारखे प्रकरण होते, तेव्हा तेथील पोलिस हैदराबादपर्यंत जाऊन आरोपींना पकडते. छत्रपती संभाजीनगरात तसे दिसत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील अशा गुन्ह्यांची, ज्यात आरोपी सापडलेले नाहीत, त्यांची यादी पोलिस महासंचालकांकडून मागविण्यात येईल, असे डॉ. नीलम गोर्र्ह म्हणाल्या.