Sambhajinagar News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दालन नूतनीकरण; नव्या सभापतींचे बसण्याचे वांदे !

मनपा प्रशासनाचा खोडसाळपणा चर्चेत; दिरंगाईमुळे नव्या वादाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar Hall renovation; seating area for new Speaker neglected

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची सत्ता येत असतानाच, मनपा प्रशासनाचा एक विचित्र खोडसाळपणा समोर आला आहे. महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांची दालने दिमाखात प्रशासनाने सज्ज करणाऱ्या स्थायी समिती मात्र सभापतींच्या दालनाकडे सपशेल दुर्लक्ष केले.

आता सभापती निवडीची प्रक्रिया तोंडावर असताना अचानक नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने नवनिर्वाचित सभापतींना महापालिकेत बसण्यासाठी जागाच उरणार नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे निवडीनंतर नवा वाद रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेची निवडणूक जाहीर होताच प्रशासनाने सर्वसाधारण संताजीनगर म निगरपालिका छत्रपती संभाजीनगर सभागृह आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनांच्या नुतनीकरणाला युद्धपातळीवर सुरुवात केली होती. गेल्या चार वर्षांपासून धिम्या गतीने सुरू असलेले सभागृहाचे काम अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात आले. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीपूवीच त्यांची दालने चकाचक करण्यात आली. हे सर्व काम होऊन दीड महिना उलटला, तरीही प्रशासनाला स्थायी समिती सभापती पदासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज दालन लागते, याचा विसर पडला होता.

प्रशासकराजचा हँगओव्हर ?

मनपावर पाच वर्षे प्रशासकराज होते. निवडणुका होऊन लोकशाही परतली असली तरी प्रशासन अजूनही प्रशासकराजच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाही का, अशी चची महापालिका वर्तुळात सुरू आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण व्हायला अजून काही दिवस लागणार असल्याने निवडीनंतर सभापतींना आपल्या दालनाबाहेर किंवा तात्पुरत्या व्यवस्थेत बसावे लागणार आहे. लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणारा हा प्रकार असल्याचे बोलले जात असून, नवनिर्वाचित सभापती यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिजोरीच्या चाव्या, पण दालनाचा पत्ता नाही!

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात, ते स्थायी समिती सभापती पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र आज सभापती पदाची निवडणूक होत असताना दालनाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. एकीकडे इतर पदाधिकाऱ्यांसाठी पायघड्या घालणारे प्रशासन, तिजोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सभापतींच्या दालनाबाबत इतके उदासीन का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT