तौफिक कालू शेख pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : तडीपार गुंडाचा एक लाखाच्या खंडणीसाठी दुकानात राडा

वृद्धाला मारहाण; ४ हजारांची चोरी, गुंडाला ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दुकान चालवायचे असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर सर्वांचे हात-पाय तोडून टाकेन, अशी धमकी देत एका तडीपार गुंडाने देवळाई चौकातील किराणा दुकानात धिंगाणा घातला. या सराईत गुन्हेगाराने दुकानातील ७५ वर्षीय आजोबांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि काऊंटरवरील ४ हजार रुपयांचे किराणा सामान जबरदस्तीने लंपास केले.

तौफिक कालू शेख (३५, रा. देवळाई परिसर) असे या सराईत गुंडाचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियान जाकीर ढेकिया (२१, रा. रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) यांचे देवळाई चौकात रॉयल सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. सोमवारी (दि.१०) दुपारी १.१० वाजेच्या सुमारास सुफियान दुकानात असताना ओळखीचा तौफिक शेख तिथे आला. त्याने सुफियानला ४ हजार रुपयांचे सामान काढण्यास सांगितले.

सुफियानने सामान काढून ४ हजार रुपये झाले, असे सांगितले असता तौफिकने अचानक वाद घालायला सुरुवात केली. तौफिकने सुफियानच्या ७५ वर्षीय आजोबांना (अरुण ढेकिया) विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करून खाली ढकलून दिले.

तडीपार तरीही परिसरात दहशत

आरोपी तौफिक शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याला महिनाभरापूर्वीच तडीपार केले होते, मात्र तरीही तो पुन्हा सातारा परिसरात खंडणीसाठी धमक्या देत व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी घरफोडी, हाणामारीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्हा दाखल होताच अटक केल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक शैलेश देशमुख करत आहेत.

यहापर धंदा करने का तो एक लाख रुपया देना पडेगा

आरोपी तौफिकने सुफियानला धमकावले. तुमको यहापर धंदा करने का होंगा तो मुझको महिना एक लाख रुपया देना पड़ेगा, नहीं दिए तो मैं देखता हु तुम धंदा कैसे करते, तुम सब घर कैसे वापस जाते मैं देखता, सबके हात-पैर यही तोड देता हु. तौफिकने काऊंटरवरील ४ हजारांचे किराणा सामान जबरदस्तीने उचलले आणि पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT