Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : छऱ्याच्या पिस्तुलातून तरुणावर गोळीबार; भावावरही तलवारीने वार

बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद येथून नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात येत असताना अचानक रिक्षातील गॅस संपल्याने पायी जाणाऱ्या एका कुटुंबाला कारमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला चढवला. रईस आणि सईद कोण आहे? अशी विचारणा करत हल्लेखोरांनी एका तरुणावर थेट छऱ्याच्या पिस्तुलातून गोळीबार केला, तर दुसऱ्या भावावर तलवारीने वार केला.

कुटुंबातील महिलांच्या पायावर कार घालत पोटात लाथा मारल्या. हा तर फक्त ट्रेलर आहे, अभी खून की होली होना बाकी है अशी धमकी दिली. हा थरार शुक्रवारी (दि. ३०) मध्यरात्री १२:०५ ते १२:३० वाजेच्या सुमारास टाऊन हॉलजवळील जयभीमनगर कमानीजवळ घडला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या मांडीवर घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी बंदुकीचे छर्रे बाहेर काढले आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात शेख वाजीद, त्याची पत्नी शेख समरीन आणि इतर चार अनोळखी इसमांविरुद्ध घातक शस्त्राने हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT