Sambhajinagar Crime News : रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला

जीवघेण्या हल्ल्याच्या घटनांत वाढ

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar criminal attacks on rickshaw driver with a Koyata

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वृत्तसवा : रेकॉर्डवरील गुन्हेगाराने जुन्या वैमनस्यातून एका रिक्षाचालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचारास सुरू आहेत. मुकुंदवाडीतील खुनाच्या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहरात जीवघेण्या हल्ल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आकाश रतन बनपुरे (२८, रा. हनुमाननगर, गारखेडा) हा रिक्षाचालक बुधवारी (दि.२२) दुपारी पुंडलिकनगर परिसरातील रेणुकानगरमधील महादेव मंदिरासमोर उभा होता. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार यश संजय पाखरे, प्रफुल्ल अजय पाखरे आणि यश वाहुळे (तिघे रा. रेणुकानगर) यांनी जुना वाद उकरून काढत आकाशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान प्रफुल्ल पाखरेने तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत आकाशवर कोयत्याने वार केला. हा वार डोक्यात लागल्याने आकाश गंभीर जखमी झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला.

दोघांना अटक

या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी यश पाखरे आणि प्रफुल्ल पाखरे या दोघांना अटक केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर उभे केले असता त्या दोघांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT