Sambhajinagar Crime MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयासमोरील अण्णा भाऊ साठे चौकात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चौकातील नाम फलकला व समोरील अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व ध्येय तत्त्व आत्मसात करीत सामाजिक चळ-वळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी प्रेरणा घेतली होती.
अण्णा भाऊ साठे यांनी देशातच नव्हे तर सात समुद्र विदेशातील आपल्या कार्याचा ठसा उमटविला. आपल्यासाठी मोठ्या सन्मान व गर्वाची भाव आहे की, रशियाच्या मास्को शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ पुतळा मोठ्या ताट मानेने आजही उभा आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, सूतगिरणीचे चेअरमन माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक माजी सभापती श्रीरंग पाटील साळवे, माजी उपसभापती नंदकिशोर सहारे, शेख जावेद, संचालक सतीश ताठे, शिव सेना शहरप्रमुख मनोज झंवर, दुर्गाताई पवार, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, शकुंतलाबाई बनसोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास लोखंडे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, राजेंद्र ठोंबरे, शेख इम्रान गुड्डू, सयाजीराव वाघ, प्रशांत शिरसागर, जितू आरके, उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी अशोक कांबळे, सखाराम अहिरे, साहेबराव सोनवणे राजू साठे नामा गायकवाड विष्णू सोनवणे बाबूराव अहिरे फकीरचंद तांबे, भगवान सोनवणे, रवींद्र महाले, महेंद्र अहिरे, राजेंद्र गोफणे संजय डमाळे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, शेख सलीम, संजय आरके यांच्यासह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.