Sambhajinagar News : सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाची जबाबदारी होणार निश्चित file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाची जबाबदारी होणार निश्चित

वारसांना महिनाभरात प्रत्येकी ३० लाखांची मदत देण्याचे निर्देश।

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar case of the deaths of sanitation workers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिव्हरलाइनमध्ये काम करताना सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर निश्चित केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सोमवारी (दि.१६) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी दिला. २०२३ मध्ये सिव्हरलाइनमध्ये काम करताना मृत्यू झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येकी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत महिनाभरात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी मनपात आयोजित आढावा बैठकीत कलोसे यांनी शासकीय योजनांची अंमलबजावणी, कायदेशीर तरतुदी पत्नी संधिशश्रीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतला. २०२३ मध्ये दोन कर्मचाऱ्यांचा सिव्हरलाइनमध्ये काम करताना मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना विम्यापोटी प्रत्येकी दहा लाख रुपये आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्यात आली आहे.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मिळणे अपेक्षित असलेली प्रत्येकी ३० लाख रुपयांची अतिरिक्त मदत अद्याप प्रलंबित आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे कलोसे यांनी स्पष्ट केले. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रतिबंधक कायदा २०१३ आणि त्यातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सिव्हरलाइनच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किटसह आवश्यक सुरक्षा उपकरणे पुरविणे आणि त्यांचा वापर अनिवार्य करावा. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुविधांबाबतही बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

महापालिकेतील ५९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्तिपत्रे तयार झाली असून, ८ डिसेंबरला महापालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते त्यांचे वितरण केले जाणार आहे. याच कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना ३२ -सदनिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच गेल्या ३० वर्षांपासून महापालिकेच्या निवासस्थानांमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित घरांचा मालकी -हक्क देण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

नमस्ते योजनेच्या जनजागृतीची सूचना

केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेचा लाभ अधिकाधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीही आयोगाने पुढाकार घेतला आहे. खासगी सेप्टिक टैंक स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक आणि अन्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी महापालिका आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने संयुक्तपणे विविध वस्त्यांमध्ये जनजागृती करावी, अशी सूचना कलोसे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT