BJP Workers Clash Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar BJP | ZP निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा : संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांचा राडा

BJP Workers Clash | मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांच्यासमोर घोषणाबाजी; गाडी अडवून ‘वैजापूरसाठी युती तोडा’च्या घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Mahayuti ZP Election Seat Sharing

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. सिल्लोड वगळता भाजप २७ तर शिवसेना २५ जागा लढवणार असल्याची घोषणा नेत्यांनी केल्यानंतर संभाजीनगर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

शहरातील कोकणवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजेपासून भाजप आणि शिवसेनेची जिल्हा परिषद युतीबाबत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर जागावाटपाची घोषणा होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली.

मंत्री अतुल सावे व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी वैजापूरसाठी युती तोडा, अशा घोषणा देत त्यांची गाडी अडवली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महानगरपालिकेच्या युतीदरम्यान भाजप व शिवसेनेत जो अंतर्गत वाद उफाळून आला होता, तसाच सूर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दिसून आला आहे. मात्र यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली नाही. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र युतीबाबत नाराजी स्पष्टपणे जाणवली.

जागावाटपात वैजापूर तालुक्याच्या दृष्टीने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत, युतीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT