Fraud Case : १० लाख घेऊन प्लॉटचे खरेदीखत; तरीही दुसऱ्याला विक्री file photo
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : १० लाख घेऊन प्लॉटचे खरेदीखत; तरीही दुसऱ्याला विक्री

चौघांविरुद्ध सिटी चौक पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Sale deed for the plot executed after accepting ₹10 lakh; yet sold to another person

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : १० लाख रुपये घेऊन एका प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत केल्यानंतरही तोच प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. ७) सिटी चौक पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तुळसाबाई पांडुरंग प्रधान (रा. तक्षशिलानगर), विजय रमेश कीर्तिकर (रा. संसारनगर), गणेश चंबुलाल परदेशी (रा. गुड्डीगुडुम) आणि राजू पांडुरंग प्रधान (रा. तक्षशिलानगर) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी पौर्णिमा विश्वनाथ हिवराळे (४८, रा. हायकोर्ट कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, क्रांती चौक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतील प्लॉट क्रमांक १७/१ (४१.८२ चौ.मी.) तुळसाबाई प्रधान यांच्या नावे होता.

२०१५ मध्ये तुळसाबाई यांनी प्लॉटसाठी १० लाख रुपयांची मागणी केल्यानंतर पौर्णिमा यांनी वेळोवेळी रक्कम देऊन व्यवहार पूर्ण केला. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी तुळसाबाई यांनी पौर्णिमा यांचा मुलगा मिथिलेश जोगदंडे यांच्या नावाने नोंदणीकृत खरेदीखत करून दिले. मालमत्ता पत्रकावर मुलाचे नाव लावणे बाकी असताना, प्लॉटचा ताबा पौर्णिमा यांच्याकडेच होता. पुण्याहून परतल्यानंतर त्या नाव नोंदणीसाठी गेल्या असता, प्लॉट विजय कीर्तिकर यांच्या नावावर असल्याचे त्यांना समजले.

माहिती असतानाही बनवले दुसरे खरेदीखत

त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून कागदपत्रे काढली असता, तुळसाबाई हिने हा प्लॉट आधीच पौर्णिमा यांच्या मुलाला विकलेला असताना आणि ही बाब खरेदीदार विजय कीर्तिकर व साक्षीदार गणेश परदेशी आणि राजू प्रधान यांना माहीत असतानाही, त्यांनी संगनमताने १७ जानेवारी २०२३ रोजी बनावट खरेदीखत करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT