Safari Park, Chikalthana Business Complex proposal shows signs of progress
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सफारी पार्क आणि चिकलठाणा येथील प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्स या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी (दि.२३) महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचीही उपस्थिती होती, अशी माहिती महापौर राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सफारी पार्कच्या प्रस्तावासह चिकलठाणा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचा विषय अद्याप जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अडकून पडला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीनंतर बोलताना महापौर राजूरकर यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील प्रस्तावित जागेच्या मागील बाजूस नाला वाहत असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध क्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे उर्वरित जागेचे मूल्य रेडीरेकनरनुसार निश्चित करून ते महापालिकेला कळविण्याचे ठरले.
दरम्यान, सफारी पार्कसाठी मिटमिटा गट क्रमांक ३०७ मधील सुमारे १७ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली असून, या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. या विषयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही पूर्वी चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. आता या प्रकरणावर मंत्रालय स्तरावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचेही निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापौर राजूरकर यांनी यावेळी दिली.
विभागीय आपत्कालीन केंद्राच्या जागाबाबत चर्चा याच बैठकीत संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी विभागीय आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र उभारण्याबाबतही चर्चा झाली. या केंद्रासाठी सुमारे सात एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच चिकलठाणा परिसरातील गट क्रमांक ४७१ व ४७२ येथे सुखना नदीच्या बॅकवॉटरवर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक जा-गेचाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवे आयाम मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात.
विभागीय आपत्कालीन केंद्राच्या जागाबाबत चर्चा
याच बैठकीत संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी विभागीय आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र उभारण्याबाबतही चर्चा झाली. या केंद्रासाठी सुमारे सात एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच चिकलठाणा परिसरातील गट क्रमांक ४७१ व ४७२ येथे सुखना नदीच्या बॅकवॉटरवर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक जा-गेचाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवे आयाम मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात