Rudreshwar Ganesh Caves : तीन हजार वर्षांपूर्वींची गणेशमूर्ती File Photo
छत्रपती संभाजीनगर

Rudreshwar Ganesh Caves : तीन हजार वर्षांपूर्वींची गणेशमूर्ती

सोयगावजवळ असणार्‍या रुद्रेश्वर लेणीकडे भाविकांचा ओघ

पुढारी वृत्तसेवा

Rudreshwar Ganesh Caves Three thousand year old Ganesha idol

सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील निसर्गरम्य अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत सोयगाव पासून चार किलोमीटर अंतरावरील रुद्रेश्वर गणेश लेणीला फार महत्त्व आहे. लेणी शेजारी असलेला वेताळवाडी किल्ला देखील पर्यटकांना आकर्षित करीत असतो.

नैसर्गिक सौंदर्य, वनराईने नटलेल्या लेणी परिसरात पावसाळ्यात गर्दी असते. या लेणीला जाण्यासाठी सोयगाव अथवा सिल्लोड, उंडणगावहून जावे लागते. खोल दरीत उतरून गेल्यावर मंदिराचा गाभारा दिसतो. तो गाभारा आणि सभामंडप 60 फूट लांब आणि 12 फूट उंच आहे.

हे मंदिर एका शिळेवर कोरले असून त्यात प्राचीन शिवलिंग आहे. हे शिवलिंग घृष्णेश्वराचे उपलिंग म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला गणपती, जवळ रिद्धी, सिद्धी. नटराज व भगवान नृसिंहाची मूर्ती आहे. पिंडीसमोरील नंदीचे कोरीव काम, हे इतिहासाच्या,कलाकारांची कलेची साक्ष देतात. समोर मोठा तीर्थकुंड असून मोठा धबधबा सुद्धा आहे.

कला आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या या लेणीला ’रुद्रेश्वर’ हे नाव यातील शिवामुळे मिळाले आहे, तर ’गणेश लेणी’ हे नाव येथील गणपतीच्या मूर्तीमुळे प्राप्त झाले आहे. रुद्रेश्वरची गणेशमूर्ती तीन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते.

मूर्ती डाव्या सोंडेची व पाच बाय पाच फुटांची आहे. चतुर्थीच्या दिवशी दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली गेली असावी, असा संशोधकांचे मत आहे. बौद्धांच्या हीनयान पंथाच्या पद्धतीनुसार मूर्ती कोरलेली असून, 850 फूट उंचीच्या अखंड दगडात काम झाले आहे.पावसाळ्यात गर्दी होत असली तरी पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात घसरड्या झालेल्या पायवाटेवरून चालणे काहीसे अवघड जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT