Robbers open fire on bullion merchant
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्यावर केलेल्या धाडसी हल्ल्याने गंगापूर तालुका हादरला आहे. नवीन कायगाव येथील मुंडलिक ज्वेलर्स दुकानात मंगळवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
दुकानदार सतीश मुंडलिक हे दागिन्यांची बॅग भरून दुकान बंद करण्याच्या तयारीत असतानाच पल्-सरवरून आलेल्या तिघांपैकी दोन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी कट्ट्याचा धाक दाखवून दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडलिक यांनी धैर्य दाखवत प्रतिकार करताच त्यांनी एक दरोडेखोराला पकडून ठेवले.
त्यावेळी दुसऱ्या दरोडेखोराने कट्ट्यातून थेट दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने दोन्ही गोळ्या लक्ष चुकल्याने मुंडलिक बालंबाल बचावले. गोळीबाराचा आवाज आणि गोंधळ पाहून नागरिक घटनास्थळी जमा झाले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून तिन्ही दरोडेखोर पल्सरवरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोनि. कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. अनिल झोरे तपास करीत आहेत. सराफा प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, या थरारक घटनेने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्याच्य