Sambhajinagar News : उपचारासाठी आलेल्या ३९ वर्षीय महिलेला रिक्षाचालकाने पळवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : उपचारासाठी आलेल्या ३९ वर्षीय महिलेला रिक्षाचालकाने पळवले

जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या विवाहित महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rickshaw driver abducts 39-year-old woman who had come for treatment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या विवाहित महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिडको बसस्थानकात उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे असे सांगत मदतीसाठी धावा केल्या. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांची जालन्यात राहणारी ३९ वर्षीय पीडित बहीण २१ मे रोजी सायंकाळी उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी बसने निघाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पीडितेने बहिणीशी संपर्क साधून मी ट्रॉफिकमध्ये आहे असे सांगितले होते. त्यानंतर साडेसातच्या सुमारास त्यांनी सिडको बसस्थानकावर पोहोचल्याचे सांगून रिक्षाने चिकलठाण्याकडे निघाल्याची माहिती दिली.

मात्र, अवघ्या काही मिनिटांत सायंकाळी ७.४८ वाजता पीडितेने फिर्यादीला पुन्हा फोन करून घाबरलेल्या आवाजात मी रिक्षात बसलेली आहे, परंतु हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे असे सांगितले आणि कॉल अचानक कट झाला.

त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. कुटुंबीयांनी सिडको बसस्थानक, परिसरातील रुग्णालये व इतर ठिकाणी शोध घेतला; मात्र महिला आढळून आली नाही. अखेर चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT