छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा; ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज (दि.25) पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वर्धा येथे झालेल्या 96 व्या आखिल भारतीय सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे पार्थिव दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययायात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जातील.
नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती राहिली. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते.