Exam Paper Error Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Police Constable Recruitment : राज्य राखीव पोलिस बल शिपाई पदाची रविवारी भरती परीक्षा

ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Recruitment Exam for the Post of State Reserve Police Force Constable on Sunday

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक २०, वरणगाव यांच्यामार्फत सशस्त्र पोलिस शिपाई भरती २०२४-२५ अंतर्गत लेखी परीक्षा रविवार (दि.१७) आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी करून वेळेत केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), बीड बायपास रोड येथील गेट क्रमांक १, ३, ५ व ८, सातारा तांडा, रेणुका माता मंदिर रोड सातारा परिसर येथे होणार आहे. उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विक्रम साळी, समादेशक तथा भरती प्रमुख, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक २०, वरणगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT