Ramadan Eid : सिल्लोडमध्ये शांततेसाठी प्रार्थना file photo
छत्रपती संभाजीनगर

Ramadan Eid : सिल्लोडमध्ये शांततेसाठी प्रार्थना

ईदगाहसह मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज, सर्वधर्मीयांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Ramadan Eid: Prayers for Peace in Sillod

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : इस्लाम धर्मीयांचा सर्वात मोठा सण मानला जाणारा रमजान ईद सिल्लोड शहरासह तालुक्यात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ईदगाहसह शहरातील विविध मस्जिदींमध्ये सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली, तर सर्वधर्मीय नागरिकांनीही ईदगाहवर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

धार्मिक व्यवस्थापन समितीच्या नियोजनानुसार शहरातील ईदगाह येथे सकाळी ८.१५ वाजता इमाम हाफिज अब्दुल कादर व मुफ्ती शेख अजहर यांच्या मार्गदर्शनाखाली ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर फतेह इस्लाम मस्जिदमध्ये ८.३० वाजता हाफिज मोहमद नजीर, जामा मस्जिदमध्ये ८ः ४५ वाजता हाफिज जुबेर खान आणि मक्का मस्जिदमध्ये ९ वाजता हाफिज एजाज खान व मौलाना आरिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. जगभरात शांतता नांदावी यासाठी मुस्लिम बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली.

यावेळी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनीही समाजबांधवांसह ईदगाह येथे उपस्थित राहून नमाज अदा केली व उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नमाजानंतर त्यांनी ईदगाह परिसरासह शिवसेना भवनात हजर राहून नागरिकांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार, सपोनी बाबू मुंढे, ज्ञानेश्वर कायंदे, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाडे, जि.प. सदस्य देविदासराव पालोदकर, अब्दुल आमेर, जि. प. माजी अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, शिवसेना शहरप्रमुख मनोज झवर, माजी सभापती नगरसेवक नंदकिशोर सहारे,

उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विनोद मंडलेचा, संजय आरके, नगरसेवक रऊफ बागवान, सिद्धेश्वर आहेर विशाल जाधव, शेख बाबूशहा, नरेंद्र बापू पाटील, सुधाकर पाटील, इम्रान गुड्डू, जुम्माखा पठाण, अकील वसईकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, चेअरमन रमेश साळवे, संघटक सुदर्शन अग्रवाल, जयराम चिंचपुरे यांची उपस्थिती होती.

पोलिसांचा बंदोबस्त

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने ईदगाह परिसरात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथे राजकीय नेते, व्यापारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT