ST BUS NEWS : एसटीच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बस दाखल file photo
छत्रपती संभाजीनगर

ST BUS NEWS : एसटीच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बस दाखल

राजूर मार्गावर मंगळवारपासून शटल सेवा होणार सुरू; विभागासाठी लवकरच चाळीस बस येणार

पुढारी वृत्तसेवा

'Rajmata Jijau' bus inducted into the ST fleet

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर विभागातील एसटीच्या ताफ्यात पाच राजमाता जिजाऊ बस रविवारी (दि.१३) दाखल झाल्या आहेत. या बस राजूर मार्गावर शटल सेवेच्या रूपात मंगळवार (दि. १६) पासून धावणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एक नवीन आणि ऐतिहासिक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवनेरी, शिवशाही आणि हिरकणी यांसारख्या लोकप्रिय बस सेवेनंतर आता राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऐतिहासिक ५ बसचे आगमन छत्रपती संभाजीनगर विभागात झाले असून, विभागासाठी ४० जिजाऊ बस उपलब्ध होणार आहेत. या बस शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबरच जिल्ह्यांतर्गत विविध मार्गावरील ग्रामीण प्रवाशांच्या सेवेत राहणार आहेत.

राजूर मार्गावर शटल बससेवा विभागाला प्राप्त झालेल्या पाच बस या मुख्य बसस्थानकातून राजूर मार्गावर शटल बससेवेच्या रूपात सेवा देणार आहेत. याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात येणार असून, या मार्गावरील प्रवाशांना आता आरामदाई प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आसन व्यवस्था, बसचे स्वरूप

  • वाढती गर्दी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन या बसची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. आसन रचना :

  • या बसमध्ये ३ बाय २ अशा पद्धतीची आसन रचना असेल

  • एकाच वेळी ५५ प्रवासी प्रवास करू शकतील एकाच वेळी ५५ प्रवासी प्रवास करू शकतील

  • ही बस आकर्षक भगव्या आणि पांढऱ्या रंगात सजलेली असेल

  • रंगसंगतीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

  • आरामदायी आसनांसह आपात्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा, प्रशस्त डिक्कीची सोय

  • महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT