Vaijapur Rain : वैजापूरमध्ये पावसाचा कहर... सर्वच १२ मंडळांत अतिवृष्टी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Rain : वैजापूरमध्ये पावसाचा कहर... सर्वच १२ मंडळांत अतिवृष्टी

दोन दिवस लगातार सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला.

पुढारी वृत्तसेवा

Rain wreaks havoc in Vaijapur... Heavy rain in all 12 mandals

मोबीन खान/नितीन श्रोरात

वैजापूर : दोन दिवस लगातार सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. शहरात अनेक परे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचा पाच जनावरेही बाहून गेले आहे. भिवगाव, नारायणगावसह १२ गावे पुराच्या विळख्यात आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे शेतीपिकांसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

नारंगी धरणातून १६०० क्युसेक विसर्ग सुरू असून, आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे शहरासत तालुक्यातील ४०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट व आमदार रमेश बोरणारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नुकसान झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून बोलणे करून दिले. शिंदे यांनी तिला मदतीची ग्वाही देत घाबरू नका, आम्ही पाठीशी आहोत, असा दिलासा दिला. तर या दोघांनी मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधला, प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर डॉ. दिनेश परदेशी यांनीही गिरीश महाजनांशी संवाद साधून तालुक्यात हेलिकॉप्टरची मदत देण्यावी मागणी केली.

प्रशासन २४ तास अलर्ट मोडवर

उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून तहसीलदार सुनील सावंत नदीकाठी तळ ठोकून, वैजापूर-बीरगाव पोलिस गरत आणि बचाव कार्यात सक्रिय चैनापुर नगरपालिकेचे कर्मचारीही सतर्क, नागरिकांना सतत सूचना व मदतकार्य सुरू.

दिवसभरात काय घडले?

४५ शहरातील नारंगी नदीला पूर आल्याने चार जनावरे वाहून गेली.

नारायणपूर भागात ७२ तास पुरात अडकलेल्या १८ जणांना एनडीआरएफच्या

टीमने सायंकाळपर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढले,

शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान, शहरातील अनेक जण बेवर

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाया शिऊर गावाला पूर्णपणे पुराचा विळखा

वैजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे नारंगी धरण शंभर टक्के भरले.

वैजापूर : तालुक्यात मागील चोवीस तासांत १२ पैकी १२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, सर्वच मंडळांत सरासरी तब्बल १५० मिलीमीटरच्या पुढे पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त १८९ मिलीमीटर पाऊस Ayu बोरसर व शिबूर मंडळात नोंद झाला. शनिवारी सायंकाळी ते रविवारी सकाळपर्यंत तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. सर्वच मंडळांत अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसाने तालुक्यातील नदी-नाले, ओळ्यांना पूर आला. यामुळे रविवारी अनेक गावांचा संपर्क तुटला असून, काही गावांना बेटाचे स्वरूप आले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, लोणी बुद्रुक, लासूरगाव, बोरसर या गावांना पुराचा वेढा होता. यामुळे सर्वच मंडळांत कोट्यवधी रुपयांचे शेतीपिकांसह नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे

तालुक्यातील १२ पैकी १२ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यातील गंगथही भागातील बहुतांशी ठिकाणी यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या भागात पुन्हा तुफानी पाऊस झाला असून यामुळे नदी, नाले, ओडे यांना पूर आला असून अनेक ठिकाणी नुकसानीचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे झालेल्या शेतीसह अन्य नुकसानीचे पंचनामे कसे करावेत, असा प्रश्न महसूल आणि कृषी विभागाला पडला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठा फाटका बसला आहे. भिवगाव येथील ३० कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते. तर वैजापूर शहर व बोरसर भागातील काही जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील चोविस तासात तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिबुर, बोरसर मंडळात प्रत्येकी १८९ मिलीमीटर, वैजापूर १७४ मिलीमीटर, खंडाळा १७२ मिलीमीटर, लोणी १७२ मिलीमीटर, गारज १५१ मिलीमीटर, लासुरगाव १२७ मिलीमीटर, महालगाव १७३ मिलीमीटर, नागमठान १७३ मिलीमीटर, लाडगाव १७३ मिलीमीटर, घायगाव १६४ मिलीमीटर तर जानेफळ मंडळात १७५ मिलीमीटर पाठास झाला आहे.

नारंगी धरण शंभर टक्के भरले...

वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे नारंगी धरण शंभर टक्के भरले असून, अजूनही या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने या धरणातून पाटबंधारे विभागाने १५८४ क्युसेकने नारंगी नदीपात्रात पाणी सोडले असून, नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT