करमाड ( छत्रपती संभाजीनगर ) : दुचाकीस्वार जात असताना रुळावर दोन्ही बाजूंनी दुचाकी अडकून खाली पडला. ती काढत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी साडेसात वाजता घडली.
या अपघातात गणेश प्रभू कापसे (३५, सदर घटनेसंबंधी करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.18) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गणेश प्रभू कापसे हा त्याच्या पत्नीला एमआयडीसीमधून घरी घेऊन येण्यासाठी स्वतःच्या दुचाकी (एम एच २० सीए ४६११) वरून लाडगाव ऑरिक सिटी हॉलकडे एमआयडीसीकडे जाणाऱ्या पायी रस्त्याने रेल्वेपटरी वरून जात असताना दुचाकी रेल्वेच्या दोन्ही रुळांत अडकली. त्यामुळे तो खाली पडला. त्याचे पाय दुचाकीमध्ये अडकल्याने ते काढण्याच्या नादात त्याच वेळी जालना दिशेकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव रेल्वेने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. सदर घटनेची रेल्वे चालकाने कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यांनी सदर माहिती करमाड पोलिसांना देऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर प्रकरणावरून पोलिस ठाणे करमाड येथे नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.