paper leak case File Photo
छत्रपती संभाजीनगर

B.Com paper leaked : परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती; १० विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त

बी. कॉमच्या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विद्याथ्यांच्या मोबाइलवर उपलब्ध झाल्याचा धक्कादायक शनिवारी (दि.११) खोकडपुऱ्यातील एका परीक्षा केंद्राबाहेर उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

Question Paper in Students' Hands Before the Exam; 10 Students' Mobile Phones Seized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बी. कॉमच्या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विद्याथ्यांच्या मोबाइलवर उपलब्ध झाल्याचा धक्कादायक शनिवारी (दि.११) खोकडपुऱ्यातील एका परीक्षा केंद्राबाहेर उघडकीस आला. या धक्कादायक प्रकरणात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १० विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त केले असून, पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शनिवारी बी. कॉम तृतीय वर्षाचा डायरेक्ट टॅक्सेसचा पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत झाला. दरम्यान, खोकडपुरा येथील एका परीक्षा केंद्राबाहेर परीक्षा सुरू होण्यापूवीच काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका आल्याचे काहींच्या निदर्शनास आले. ही घटना समजताच विद्यापीठ प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली असून, त्यांनी तातडीने तपासणी मोहीम राबवली.

यावेळी काही विद्याथ्यीकडे संशयास्पद मेसेजेस व प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. अशा जवळपास १० विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान, जप्त केलेल्या मोबईलची सखोल तपासणी करून प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कशी लीक झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पैसे मोजताच मोबईलवर प्रश्नपत्रिका येत असल्याची चचर्चा केंद्राबाहेर सुरू होती. पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड पाठविला जातो. पैसे मिळताच प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

१४० रुपयांत पेपर

बी. कॉम तृतीय वर्षाच्या डायरेक्ट टॅक्सेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचा प्रकार निदर्शनास आल्यावर विद्यापीठ प्रशासनाने दहा विद्यार्थ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांनी १४० रुपयांत पेपर व्हॉट्सअॅपवर मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले

चौकशीअंती पुढील कारवाई परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही विद्याथ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. घटना नेमकी कुठे आणि कशी घडली. याची माहिती घेऊन दोषींवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणांत काही विद्याथ्यीचे मोबईलही जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळांला भेट देऊन या प्रकरणांची खातरजमा केली आहे.
डॉ. बी.एन. डोळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT