Imtiaz Jaleel Controversy
छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी आज (दि.२३) छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला.
माजी खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या हरिजन शब्दामुळे बौद्ध समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या संतप्त भावनेतून आंबेडकरी अनुयायांनी आज क्रांतीचौक येथून जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात शहरासह इतर जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन कर्त्यानी जलील विरोधात केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.