Sambhajinagar News : नूतन अधीक्षकांसमोर ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा पाढा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : नूतन अधीक्षकांसमोर ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा पाढा

रेफर सेंटरची ओळख मिटवा; डॉ. आहिरराव यांच्यासमोर ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Problems in rural hospitals presented to new superintendents

देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. नीलेश आहिरराव यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यभार स्वीकारताच त्यांनी तातडीने रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व गावातील प्रमुख नागरिकांच्या समवेत बैठक घेतली. गेल्या दोन महिने रिक्त असलेले हे अधीक्षक पद आता भरल्याने रुग्णालयातील कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यभार स्वीकारताच डॉ. आहिरराव यांनी अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन समस्यांचा आढावा घेतला.

या बैठकीत पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे यांनी नेतृत्व करत रुग्णालयातील विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण रुग्णालय हे केवळ मरेफर सेंटरफ बनले असल्याचे नमूद करत रुग्णसे वेत सुधारणा करण्याची गरज अध ोरेखित केली. बैठकीत ग्रामस्थांनी रुग्णालयातील सेवा वेळेवर, दर्जेदार आणि शिस्तबद्ध मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. डॉ. नीलेश आहिरराव यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, ङ्गङ्घरुग्णसेवा हा माझा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल.

आवश्यक त्या सुविधा मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल, फ्फ असे आश्वासन दिले. या बैठकीस माजी पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, डॉ. संजय गव्हाणे, उपसरपंच पती आसिफ पठाण, माजी उपसरपंच सुनील गंगवाल, ग्रामपंचायत सदस्य ललित सुरासे, कलिम मनियार, प्रल्हाद ठोंबरे, किशोर दिवेकर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रघुनाथ गोरे, सागर महाले, सुनील दाभाडे तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर चौधरी, संतोष गंगवाल, राहुल वायकोस, नीलेश गोंधळे, मुजिब सय्यद, सतीश करडे पदाधिकारी आणि गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या

२४ तास डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी, प्रसूतिसाठी सुविधांअभावी महिलांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागते गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयात रेफर करावे लागते, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया होत नसल्याने महिलांना इतरत्र जावे लागते, ट्रॉमा केअर सेंटर सुरू करून अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, नवीन रुग्णालय इमारतीचे काम लवकर पूर्ण करून सुरू करावे आदी मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी डॉ. अहिरराव यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT