Pre-draw meeting for the PM Awas Yojana today
छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घटक क्रमांक ३ (एएचपी) गृहप्रकल्पासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेपूर्वी उच्चस्तरीय देखरेख समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. २६) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॉटरी प्रक्रियेच्या पारदर्शकतेसह विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे.
दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीत ओएससी समितीचे सदस्य उपस्थित रा-घरवाटप प्रक्रियेला वेग : स्मार्ट सिटी कार्यालयात उद्या अंतिम ड्रॉ हणार असून, लॉटरीपूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी १० वाजता स्मार्ट सिटी कार्यालयात अंतिम लॉटरी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेकडे तब्बल ४० हजार अर्ज प्राप्त झाले असून, घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांचे लक्ष आता या लॉटरी प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे. पडेगाव, हसूल, सुंदरवाडी आणि तीसगाव या भागांमध्ये सुरू असलेल्या दोन गृहप्रकल्पांतील बांधकामाधीन फ्लॅट्सचे वितरण लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असून, पारदर्शक आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान लॉटरी पध्दतीने ड्रॉ काढण्यात आल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली जाणार आहे.