शेंद्रा एमआयडीसीतील निकृष्ट कामांवर थातूर-मातूर भरपाईचा लेप File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शेंद्रा एमआयडीसीतील निकृष्ट कामांवर थातूर-मातूर भरपाईचा लेप

कशी होतील दर्जेदार कामे ? ठेकेदारांना प्रशासनाचेच खतपाणी, कागदोपत्री नोटीसचा खेळ, थेट कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

Poor road work in Shendra MIDC, no action taken against the contractor

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : काम मिळवायचे... ते निकृष्ट दर्जाचे करायचे.. टिकले ते टिकले.. आणि पितळ उघडे पडले तर पुन्हा बातूर-मातूर पंचवर्क करून कागदोपत्री ओके रिपोर्ट मिळवून विषय संपात्रयचा. असा खेळ केंद्रा एमआयडीसीत बिनबोभाटपणे सुरू आहे. यामुळे उद्योगनगरीतील रस्त्यांची पुरती वाट लागली असून, शासनाचा कोट्यवधीचा निधी दरवर्षी अक्षरश: खड्यात जात आहे. गंभीर बाब महणजे, प्रशासनाकडूनच ठेकेदारांना अभय मिळत आहे. नोटीस बजावण्यापलीकडे वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करत नसल्याने मकशी होतील दर्जेदार कामे ? असा संताप उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.

शहरासह मराठवाडपाच्या औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीत रस्ते ठेकेदारांचाच उद्योगबंदा तेजीत सुरू आहे. या औद्यागिक वसाहतीमधील प्रवेश मार्ग असलेल्या ए, ओ, पी, क्यू, आर. या रस्त्याचे तब्बल ८ कोटी, ६७ लाख ९४ हजारांच्या निधीतून गतवर्षी रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले.

मात्र, काही महिन्यांतच हा रस्ता उखडून जागोजागी खड्डे पडले. त्यावर थातूरमातूर पंचवर्कची मलमपट्टी करण्यात आली. मात्र, तेही काम अत्यंत निकृष्ट झाल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. रेडिको कंपनीसमोरील ही ब्लॉकमधील वा रस्त्याचे ५ कोटी, १३ लाख १६ हजार ०७ रुपयांच्या निधीतून डांबरीकरण केले. मात्र, सद्यस्थितीत हा संपूर्ण रस्ताच जमिनीत रुतल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खट्टे पहले आहेत. या दर्जाहीन कामांमुळे येथील रस्त्यांचा अक्षरशः धुरळा झाला आहे. अशीच अवस्था एमआयडीसीमधील अनेक रहस्यांची झालेली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्याच्या चाळणीमुळे एमआयडीसीची वाटच खडतर झाली आहे.

अंतर्गत रस्तेही खड्यांनी भरलेले

एमआयडीसीमधील प्रमुख मागांसह अंतर्गत सत्यांचीही दयनीय दुरवस्था झालेली आहे. मुख्य औद्योगिक क्षेत्राला जोडणार अनेक ठिकाणी हे रस्ते अक्षरशः सङ्ख्यांनी भरले असूर, लहान-मोठ्या अपघाताचे कारण ठरत आहे. या औद्योगिकनगरीत दररोज हजारो बाहने ये-जा करतात. मय रस्त्यांमुळे वाहनचालकांना गयके बसत आहे, स्थानिक उद्योजक आणि कामगार वर्गाकडून रोष व्यक्त होत आहे.

थेट कारवाई नसल्याने ठेकेदारही निर्ढावले

रस्त्यायी निकृष्ट कामे करा, नोटीस आली तर पुन्हा पंचवर्कची कामेही ततीय दर्जाहीर करा. थेट दंडात्मक अथवा ब्लक लिस्टण्या कठोर कारवाईचे भय नसल्याने ठेकेदारही निर्धावले आहे. पुन्हा पुन्हा दर्जाहीन आणि निकृष्ट कामांगुळे औद्योगिक वसाहतीमचील रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

टेंडर कंडीशननुसार प्रक्रिया टेंडर कंडीशननुसार मुदतीच्या आत रस्ता खराब झाल्यास कंत्राटदाराच्या खचातून तो रस्ता दुरुस्त करून घेणे असेच आहे. त्याप्रमाणे नोटीस दिली, आर्थिक दंडाची तरतूद नाही. रस्ता उखडला तर दुरुस्त करून घेणे आणि कंत्राटदाराने केला नाही तर पुढचों कारवाई केली जाते.
आर.डी. गिरी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT