Arrest Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : न्यायालयाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

या आरोपींविरुद्ध पैठण पोलिसांनी शुक्रवारी (दि.३०) कारवाईची मोहीम हाती घेतली.

पुढारी वृत्तसेवा

Police action against those who are absent on court dates

पैठण, पुढारी वृत्तसेवा : वेगवेगळ्या गुन्ह्यांतील न्यायप्रविष्ठ प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट असलेल्या पैठण पोलिस ठाणे हद्दीतील २० आरोपींना अनेक वेळेस समज देऊनही न्यायालयाच्या तारखेला गैरहजर राहत होते. या आरोपींविरुद्ध पैठण पोलिसांनी शुक्रवारी (दि.३०) कारवाईची मोहीम हाती घेतली. याप्रकरणी वीस आरोपींना अटक करून न्यायालय समोर हजर केले. या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेले अनेक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणातील न्यायालयाच्या तारखेला सतत गैरहजर रहात होते.

अशा अजामीनपात्र वॉरंट आदेश असलेल्या आरोपींविरुध्द पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्न-पूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवार, उपनिरीक्षक संभाजी खाडे, प्रमोद यादव, ऋषिकेश तळेकर, अजिज शेख, सपौ सुधीर ओव्हळ, पोह विलास सुखदान, वॉरंट विभाग प्रमुख अनिरुद्ध पवार, महेश माळी, राजेश आटोळे, चेडे, तांबे, ढाकणे यांनी मोहीम राबविली. या २० आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT