Unseasonal Rain : पाटोदा शहर परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले file photo
छत्रपती संभाजीनगर

Unseasonal Rain : पाटोदा शहर परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले

घरांवरील पत्रे उडाले; झाडे उन्मळली, वीजपुरवठा विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

Patoda town and its surrounding areas were battered by stormy winds

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा पाटोदा शहर व परिसराला बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले, जवळपास अर्धा तास झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तसेच झाडेही उन्मळून पडली.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या पाटोदाकरांना बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जवळपास अर्धा तास झालेल्या वादळामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले, तसेच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले तसेच विजेचे खांब कोसळल्याने बीजपुरवठा विस्कळीत झाला आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे उकाड्यापासून मात्र पाटोदाकरांना दिलासा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT