Shivshahi Bus : उतारावर पळती, चढ येताच थकती File Photo
छत्रपती संभाजीनगर

Shivshahi Bus News : उतारावर पळती, चढ येताच थकती

देखभालीअभावी शिवशाहीची दमछाक

पुढारी वृत्तसेवा

Passengers Hit by Technical Glitches in Shivshahi Buses Due to Lack of Maintenance

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित बस एसटीची शान होती. आजच्या घडीला मात्र तिच्या देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे शिवशाही बसची घाट असो की साधा चढ असो मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. ही बस केवळ उतार येताच सुसाट पळते, मात्र चढ आला की लगेच थकते. याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे शान असलेल्या शिवशाहीतून प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला नाशिक मागनि येताना इगतपुरीजवळ कसारा घाट लागतो. हा घाट १४ किलोमीटर अंतराचा आहे. हा घाट चढताना बुधवारी (दि.२९) शिवशाहीची एसी यंत्रणा बंद करूनच गाडी चालवावी लागली. हा घाट पूर्ण करण्यासाठी तब्बल पाऊणतासाचा वेळ लागला.

डौलाने चालणारी शिवशाही येथे मात्र तिची उतारावर सुसाट पळणारी शिवशाही चढावर मात्र संथ गतीने चालत होती. त्याच वेळी लोड घेत नसल्याने अनेकदा एसी बंद करून चढ चढाव चढावा लागत असल्याने याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागला. ४० च्या वर गे लेला उन्हाचा पारा त्यात दारे खिडक्या आणि एसीही बंद अशा स्थितीत प्रवास करताना प्रवाशांचीही धाकधूक वाढली होती.

शिवशाही नको रे बाबा

शिवशाहीत वातानुकूलित सेवेसह इतर सेवा या एकदम कमी दर्जाच्या आहेत. त्याच बरोबर या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याचा अनुभव अनेक प्रवाशाला विविध मार्गांवर आल्याने आता लालपरी चालेल पण शिवशाही नको रे बाबा, असे प्रवासी उघडपणे बोलत आहेत. विशेष म्हणजे तिकीट आकराणी ही सुविधानुसार जास्त घेतली जाते, परंतु शिवशाहीत सुविधांचा आभाव मोठ्या प्रमाणात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT