Pankaja Munde file photo
छत्रपती संभाजीनगर

Pankaja Munde: प्रचारासाठी जाताना पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Pankaja Munde helicopter issue: प्रचारासाठी लातूरकडे जात असताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pankaja Munde helicopter issue

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, प्रचारासाठी लातूरकडे जात असताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे या आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून लातूर दौऱ्यासाठी रवाना होणार होत्या. मात्र, उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले.

पंकजा मुंडे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर निघाल्या होत्या. सध्या या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या बिघाडामुळे त्यांच्या आयोजित सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने आपल्या पुढील सभांना हजेरी लावण्यासाठी रवाना होतील.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उचलणार मोठं राजकीय पाऊल

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. नुकत्याच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आता पक्षाला सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून, या दौऱ्याला 'अजित दादा स्मृती यात्रा' असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT