पैठण:- पैठण तालुक्यातील विहामांडवा शिवारातील दहा एकर ऊस जळुन खाक झाल्याची घटना रविवारी दि.३० रोजी दुपारी घडली असून. दरम्यान ही आग शेतातील विद्युत तारेच्या घर्षण झाल्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
विहामांडवा परिसरातील शेतकरी मुस्ताक रज्जाक शेख व आजिज निजाम शेख यांची शेती गट क्रमांक १७६ मधील ऊसाला अचानक आग लागल्याची घटना निदर्शनास आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
सदरील आग शेतातील विद्युत तारेच्या घर्षण झाल्यामुळे लागल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला असून. या आगीमध्ये दहा एकर ऊस जळून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची खबर मिळताच महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक घुले यांनी तातडीने अभियंता झांजे यांच्या पथकाला पाचारण करून पंचनामा करण्याचा आदेश दिला आहे.