प्रातिनिधीक छायाचित्र (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

पैठण : शेकटा येथील शेततळ्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू !

Chhatrapati Sambhaji Nagar News | शेततळ्यात अंघोळीसाठी गेले असता घडली दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

पैठण पुढारी वृत्तसेवा:- पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेकटा येथील शेततळ्यात दोन अल्पवयीन मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडले असून. सायंकाळी बुडून मृत्यू झालेल्या प्रणव दीपक दाभाडे वय १२ वर्ष व प्रसाद दत्तात्रय दाभाडे वय १० वर्ष रा.शेकटा या मुलांना अग्निशमन दलाची जवान व गावकऱ्याच्या मदतीने बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके यांच्या पथकाने पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आहे.

अधिक माहिती अशी की तालुक्यातील शेकटा येथील रविवारी रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत प्रणव दीपक दाभाडे व प्रसाद दत्तात्रय दाभाडे हे दोन मुलं आपल्या शेतातील शेततळ्यातील पाण्यात अंघोळीसाठी उतारले असता. यावेळी सदरील दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाची जवान व पोलीस पथक, गावकऱ्यांच्या मदतीने मुलाचे प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा करून सदरील मुलाचे मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम करून या दोन्ही मुलांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून. या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बिडकीन पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती सपोनि निलेश शेळके यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT