पैठण :- पैठण तालुक्यातील खंडाळा येथे नवरात्र देवीच्या घाटाजवळ मोटरसायकलसाठी आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीरत्या भाजल्याची घटना बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी घडली होती. या जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना. यातील गंभीर भाजलेले आकाश प्रकाश दळवी वय १५ वर्ष अविनाश प्रकाश दळवी वय १४ वर्ष रा.खंडाळा ता. पैठण या बालकाचा रविवारी दि.५ रोजी उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की तालुक्यातील खंडाळा येथील प्रकाश मोहन दळवी यांनी मुलगा मोटरसायकल घेऊन फिरवतो म्हणून मोटरसायकल मधील पेट्रोल बाटलीमध्ये काढून घरामध्ये ठेवले होते. याच ठिकाणी नवरात्र देवीचा घट मांडलेला होता या ठिकाणी दिवा जळत असल्याने. बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी अचानक पेट्रोल काढलेल्या बाटलीचा भडका होऊन. यामध्ये एकाच परिवारातील प्रकाश दळवी, राधा उर्फ सुरेखा दळवी, आकाश प्रकाश दळवी, अविनाश प्रकाश दळवी हे चार जण गंभीर भाजून जखमी झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच. पाचोड सपोनि सचिन पंडित, विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीहरीविजय बोबडे, बीट जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळावर जाऊन जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना गावातील नागरिकाच्या मदतीने प्रथम पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु. या घटनेमध्ये चारी सदस्य गंभीर भाजल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना. आकाश प्रकाश दळवी वय १५ वर्ष रविवारी दि.५ रोजी व अविनाश प्रकाश दळवी वय १४ वर्ष शनिवार दि.४ रोजी या दोन्ही बालक मृत्यू झाल्याची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीहरीविजय बोबडे, जमादार किशोर शिंदे हे करीत आहे.