पैठण :- पैठण पोलिसांनी एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा गोवंश हत्या करून मास विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून देखील मास विक्रीचा प्रकार सुरू असून शुक्रवारी दि.९ रोजी पैठण पोलिसाच्या पथकाने १ लाख ४४ हजार रुपयाचे १६० किलो मांस जप्त करून हत्या करण्यासाठी आणलेल्या सहा गोवंशाची सुटका केली आहे.
अधिक माहिती अशी की पैठण शहरातील नेहरू चौक परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या गोवंश हत्या करून मांस विक्री करीत असल्याची खबर पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना प्राप्त झाल्याने सलग कारवाई करून देखील गोवंश हत्या करून मास विक्री करण्याचा प्रकार सुरूच होता. शुक्रवारी दि.९ रोजी पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, पोलीस हवालदार विलास सुखदान या पोलीस पथकाने मांस विक्री होत असलेल्या नेहरू चौक कुरेशी मोहल्यात अचानक छापा मारला. या ठिकाणी गोवंश हत्या केलेले व खुलेआम मांस विक्री करण्यासाठी कापून ठेवलेले १६० किलो गोवंश मास दोनशे रुपये किलो प्रमाणे १ लाख ४४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केले.
हत्या करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र व हत्येसाठी आणलेले वेगवेगळ्या जातीचे सहा जनावरांची सुटका यावेळी पोलीस पथकाने केली. या ठिकाणी मांस विक्री करणाऱ्या इम्रान मन्नान कुरेशी, ईशाद मन्नान कुरेशी, मन्नान बाबामीया कुरेशी, फारुख शमशोद्दीन कुरेशी, शब्बीर रशीद कुरेशी सर्व राहणार नेहरू चौक कुरेशी मोहल्ला पैठण यांच्याविरुद्ध हवालदार विलास सुखदान यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, पोहेका गायकवाड हे करीत आहे.